रस्त्यात अडवून अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन

0
343

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – क्लासवरून घरी पायी जात असलेल्या 17 वर्षीय मुलीला रस्त्यात अडवून एकाने तिच्याशी गैरवर्तन केले. हा प्रकार मंगळवारी (दि. 18) रात्री रिव्हर रोड, पिंपरी येथे घडली.

लखनलाल विन्द्रावन (वय 45, रा. पिंपरी. मूळ रा. उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास क्लासवरून घरी पायी जात होती. रिव्हर रोडने जात असताना दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी फिर्यादीजवळ येऊन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. लखनलाल याने फिर्यादीसोबत गैरवर्तन केले. मुलीने आरोपीला विरोध केला आणि मोठमोठ्याने आरडाओरडा केला. दरम्यान तिथून पीडित मुलीचे नातेवाईक जात होते. नातेवाईकांनी लखनलाल याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.