विवाहितेच्या छळ प्रकरणी गुन्हा दाखल

0
629

भोसरी, दि. १८ (पीसीबी) – दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. हा प्रकार नोव्हेंबर 2021 ते 17 ऑक्टोबर 2022 या कालावधीत बीड येथे घडला. विवाहितेने माहेरी आल्यानंतर याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे.

विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आकाश संपतराव वाघमारे (वय 27), संपतराव भानुदास वाघमारे (वय 63), स्वप्नील संपतराव वाघमारे (वय 30), गौतम भानुदास वाघमारे (वय 55), भागवत भानुदास वाघमारे (वय 59), गोविंदराव काळे (वय 60), दोन महिला (सर्व रा. पंचशीलनगर, बीड), प्रकाश दादाराव गवळी (वय 63, रा. उस्मानाबाद) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन माहेरहून दुचाकी घेण्यासाठी पैसे आणण्याची मागणी केली. इतर किरकोळ कारणांवरून वारंवार आरोपींनी त्रास दिला. फिर्यादीस शिवीगाळ, हाताने मारहाण करत धमकी दिली. विवाहितेचा छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विवाहितेने माहेरी आल्यानंतर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस हा गुन्हा पुढील तापासाठी बीड पोलिसांकडे वर्ग करणार आहेत.