एसटी सेवेतील रिल्सस्टार मंगला गिरी यांचे निलबंन अखेर मागे

0
371

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – टिकटॉक स्टार लेडी कंडक्टर मंगल गिरी यांचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलं आहे. कळंब आगार व्यवस्थापक यांनी हे निलंबन मागे घेतलं आहे. मंगल गिरी यांनी डुयटीवर असताना कंडक्टरच्या ड्रेसमध्ये रिल्स आणि व्हिडिओ बनवले होते. या महिला कंडक्टरने बस मध्ये ऑन ड्युटी खाकी ड्रेसवरील व्हिडीओ तयार करुन एसटी महामंडळाची प्रतीमा मलीम केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

कळंब आगारातील महिला वाहक मंगल गिरी या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असतात. आपल्या रिल्सच्या माध्यमातून त्या चांगल्याच लोकप्रिय झाल्या. मात्र, हे सर्व महामंडळासाठी बदनामीकारक ठरत असल्याचा ठपका ठेवत 1 ऑक्टोबर रोजी त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. यानंतर विविध स्तरातून यावर आक्षेप घेण्यात आला. अखेर वाढता दबाव पाहता हे निलंबन मागे घेण्यात आलं आहे.

गिरी यांच्यावर झालेल्या कारवाईची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू झाली होती. अनेक राजकीय मंडळींनी सुध्दा यावर ट्वीट करून निलंबन मागे घ्यावे अशी मागणी केली होती. सोशल मीडीयावर लेडी कंडक्टरसह सहकाऱ्याला निलंबीत केले होते. तरी या व्हिडीओमुळे सोशल मीडीयावर हवा करणाऱ्या मंगल सागर गिरी यांचे लाखो फॉलोवर्स झाले होते. त्यांच्या समर्थनार्थ अनेक वादविवादाच्या टिपण्या एसटी महामंडळातर्फे करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अखेर एसटी महामंडळाला त्या दोघांचे निलंबन मागे घ्यावे लागले.