पॅरालिंम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांचा रोटरी क्लबकडून गौरव

0
301

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – भारताचे पहिले पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते पद्मश्री मुरलीकांतजी पेटकर यांचा रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या वतीने कृतज्ञतापुर्वक सत्कार करण्यात आला.चिंचवड येथील रोटरी क्लब हॉल मध्ये 11 ऑक्टोबर रोजी आपल्या मासिक सभेत पद्मश्री पेटकर यांना सभासदांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावण्यात आले होते, याचवेळी भारताचे नाव रोशन करणाऱ्या पेटकरजीचा सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देत असताना पेटकर यांनी आपल्या आयुष्यातल्या अनेक साहसी मोहिमांची माहिती उलगडून सांगून उपस्थित श्रोत्यांना खिळवून ठेवले.याचवेळी त्यांनी आपल्याला रोटरीक्लबने वेळोवेळी केलेल्या मदतीबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी रोटरी क्लब पिंपरीचे अध्यक्ष संजय प्रधान, ,पद्मश्री पेटकर यांचे गुरु आणि अण्णासाहेब मगर जलतरण तलावाचे प्रशिक्षक पाटील सर,आंतरराष्ट्रीय कोच आणि पेटकर यांचे चिरंजीव अर्जुन पेटकर, रोटरी क्लब पिंपरीचे सचिव संतोष गिरंजे आणि इतर सदस्य उपस्थित होते.