महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाची निर्मिती : आशा कांबळे

0
212

– कष्टकरी कामगार पंचायतच्या महिला बचत गटाची स्थापना

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) -दैनंदिन अडचणी सोडवून महिलांना आर्थिक सक्षम करणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी विविध शासकीय योजना पोचवण्याबरोबरच महिलांना स्वतःच्या पायावर उभा करणे गरजेचे आहे. महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाची निर्मिती करून त्याद्वारे त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन घरकाम महिला सभा अध्यक्षा आशा कांबळे यांनी केले.

ऑटो रिक्षा, टॅक्सी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कष्टकरी महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली. या वेळी आयोजित कार्यक्रमात आशा कांबळे बोलत होत्या.

या वेळी माजी नगरसेवीका ज्योती भारती, शर्मा ताई, कष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष, बळीराम काकडे, सरचिटणीस मधुरा डांगे, प्रकाश यशवंते, महिला बचत गट अध्यक्षा सविता लोंढे, उपाध्यक्षा आशा पठारे, खजिनदार कल्पना पारदे, निर्मला घारे, शारदा पवार, स्वाती घायल, कविता सरतापे, छाया कांबळे, मंगल कसबे, लक्ष्मी ठाकरे आदीसह महिला सभासद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. २० महिला सभासदांचा बचत गट स्थापन करण्यात आला असून संघटनेच्या माध्यमातून ऐकून ५ महिला बचत गट चालविले जात आहेत.

आशा कांबळे म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड महापालिकेत कंत्राटी पद्धतीने ठेकेदारांमार्फत अनेक महिला कर्मचारी नियुक्त केल्या आहेत. शहरातील रस्ते सफाई असो किंवा इतर अनेक कामात महिला मदत करतात. मात्र ठेकेदाराकडून त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. महिन्याला वेतन दिले जात नाही. विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जात नाही. परिणामी घर खर्च कसा चालवायचा असा प्रश्न महिलांपुढे असतो. त्यामुळे महापालिकेतील ठेकेदारी पद्धत बंद करून महिला बचत गटाला कामे द्यावीत, असे प्रतिपादन या वेळी आशा कांबळे यांनी केले.