मुंबई , दि.९(पीसीबी) – केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं, तसेच शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाहीये.अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत धनुष्यबाण हे चिन्ह कुणालाही वापरता येणार नाही असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. यानंतर पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट नव्याने एकमेकांसमोर आले आहेत. यानंतर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली.
केसरकर म्हणाले की, निवडूक आयोगाच्या आदेशानंतर मुंबईमध्ये खोटी सहानुभूती पाहीजे म्हणून त्यांनी निवडणूक आयोगाकडे म्हणणं मांडलचं नाही ते सारखं तारखा घेत राहीले. जेव्हा निवडूक आयोगाने चिन्ह गोठवलं तेव्हा त्यांचा अर्ज तयार होता. त्यांची चिन्हं तयार होती. त्यांना धनुष्यबाणाबद्दल प्रेम नव्हतंच. त्यांना फक्त खोटी सहानुभूती घ्यायची होती. आम्हाला धनुष्यबाण बाळासाहेबांबद्दल आभिमान आहे म्हणून आम्ही आता ठरवतोय कुठलं चिन्ह घ्यायचं. आम्हाला हे अपेक्षित नव्हतं. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांना ते मिळणार अशी आमची अपेक्षा होती आणि आज ना उद्या ते आम्हाला मिळणार कारण आमच्याकडे बहुमत आहे, असे केसरकर म्हणाले.
अडीच वर्षात कोणची भेट घेतली नाही, जेव्हा सत्ता गेली तेव्हा उंभरे झिजवायला सुरूवात केली, यात्रा, ट्विट करायला सुरूवात झाली असे केसरकर म्हणाले. तुम्ही शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलं आणि ते पुर्ण केलं नाही त्यामुळे कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला हे लोक जाणू शकतात असे केसरकर म्हणाले.
पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, ठाकरे गटाने खूप वेळा वेळ मागून घेतला होता. आम्ही आमच्या मतावर ठाम आहोत. आम्ही निवडणूक आयोगाकडे आमचं धनुष्यबाण चिन्ह मागणार आहोत. आमच्याकडे जास्त लोकं आहेत. चिन्हं गोठवल्याचं दु:ख त्यांच्यापेक्षा जास्त आम्हाला आहे. जर त्यांना वाईट वाटत होतं तर त्यांनी नवीन चिन्ह आणि नावं का दिली? आम्ही आजही आमच्या चिन्हांवर आणि पक्षावर ठाम आहोत. आम्ही निवडणूक आयोगाकडून आमचं चिन्हं मागणार आहोत असे केसरकर म्हणाले आहेत.