अखिल भारतीय आखाडा परिषदचे अध्यक्ष सागरानंद सरस्वती महाराज यांचे निधन

0
181

नाशिक, दि. ८ (पीसीबी) : अखिल भारतीय आखाडा परिषदचे अध्यक्ष सागरानंद सरस्वती महाराज यांचे निधन झाले आहे. वयाच्या १०२ व्या वर्षी त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाशिकमध्ये होणाऱ्या अनेक सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेय. देशभरात सागरानंद महाराज यांचे लाखो भक्त आहेत. स्वामीजी ब्रह्मलिन होण्याने त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यातील सूर्य मावळला आहे. ते काही महिन्यांपासून वृद्धपकाळाने आजारी होते.

श्री. महंत स्वामी सागरानंद सरस्वती महाराज आज पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास ब्रम्हलीन झाले. त्यांनी वयाची शंभरी पार केली होती. त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा १९६८, १९८०, २००३ आणि २०१५ त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. ते अखिल भारतीय आखाडा परिषदचे अध्यक्ष होते. त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यासह ईलाहाबाद , प्रयाग, हरिद्वार अशा १९ कुंभमेळ्यात ते सहभागी झाले होते. त्यांची ज्येष्ठ श्रेष्ठ, ज्ञानवृद्ध, तपस्वी जूने जाणते महंत अशी ख्याती आहे. २०२७ च्या कुंभमेळ्याची तयारी सुरु झाली आहे. पण येत्या कुंभमेळ्यात सहभागी होऊ की नाही हे देवाच्या हातात असते, असेही त्यांनी सांगितले होते.