नरेंद्र मोदी यांचा जीवनपट पाहण्याची संधी

0
227

पिंपरी, दि. २ (पीसीबी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चित्रमय जीवनपट पाहण्याची संधी माजी नगरसेविका शर्मिला बाबर यांनी निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २५ मधील कॅप्टन कदम सभागृहात उपलब्ध करून दिली आहे. नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस (१७ सप्टेंबर) आणि महात्मा गांधी जयंती (०२ ऑक्टोबर) हा कालावधी ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ या संकल्पनेंतर्गत जाहीर करण्यात आला होता.

त्याची सांगता करताना नरेंद्र मोदी यांच्या बालपणापासून ते आजतागायत असलेल्या ठळक प्रसंगांवर आधारित ‘मोदी भारतमातेला समर्पित पुत्राची कहाणी’ हे दोन दिवसीय चित्रप्रदर्शन रविवार आणि सोमवार म्हणजेच ०२ आणि ०३ ऑक्टोबर दरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्वांना विनामूल्य पाहण्यासाठी खुले आहे.

चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नवनगर प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, भाजप शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अनुप मोरे, शर्मिला बाबर यांची उपस्थिती होती. राजेंद्र बाबर यांनी प्रास्ताविक केले. विजय शिनकर यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत भिंगारकर यांनी आभार मानले.