अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी स्वीकारला पदभार

0
724

पिंपरी दि. २३ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी आज (शुक्रवारी) दुपारी महापालिकेत दाखल होत तातडीने पदभार स्वीकारला.

भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील (IRPFS)  विकास ढाकणे यांची 13 सप्टेंबर रोजी राज्य शासनाने महापालिका अतिरिक्त आयुक्तपदावरील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली होती. त्यांच्याजागी महापालिकेतच सहाय्यक आयुक्त म्हणून काम केलेल्या आणि आता  उपायुक्त असलेल्या स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली होती. पण, नियुक्तीचा आदेश येवूनही झगडे यांना नऊ दिवस अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार आयुक्तांनी दिला नव्हता.

गुरुवारी सायंकाळी झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदावरील नियुक्ती रद्द झाल्याचा शासन आदेश आला. त्यांच्याजागी वसई-विरार महापालिकेचे उपायुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. गुरुवारी नियुक्तीहोताच जांभळे-पाटील आज शुक्रवारी तातडीने दुपारी महापालिकेत दाखल झाले. रूजू अहवाल आयुक्तांकडे पाठविला आणि आयुक्तांनी अहवालावर स्वाक्षरी केली. त्यानंतर जांभळे-पाटील यांनी दालनात जाऊन अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला