नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) : भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याचं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचं (PFI) उद्दिष्ट असल्याची माहिती काल एनआयएकडून अटक केलेल्या PFI च्या संबंधित आरोपींनी दिली आहे. शरियत कायद्यानुसार भारताला २०४७ पर्यंत मुस्लीम राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट होते अशी माहिती ATSच्या सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, गुरूवारी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि दहशतवादी विरोधी पथकाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) देशभरातील कार्यालयावर छापे टाकले होते. त्यामध्ये PFIच्या १०० पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली होती.
दहशतवाद्यांशी संबंध आल्याच्या संशयातून PFIच्या देशभरातील कार्यालयावर छापे टाकण्यात आले असून अनेक पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. महाराष्ट्रातील २० पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. तर या छाप्यानंतर PFIच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केले आहेत. त्यामुळे याप्रकरणी वातावरण पेटण्याची शक्यता आहे.
या देशात मुस्लिमांवर अन्याय केला जातोय अशी भावना शरियत कायद्यांनुसार निर्माण केली जात आहे. यासाठी PFIच्या कार्यकर्त्यांकडून मुस्लीम युवकांना टार्गेट करण्यात येत होते. मुस्लीम युवकांना हिंदू धर्माबद्दल चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली जात होती. आपल्याला २०४७ पर्यंत भारताला शरियत कायद्यानुसार मुस्लीम राष्ट्र बनवायचं आहे. आपला इथल्या संविधानावर विश्वास नाही असं PFIकडून मुस्लीम युवकांना सांगण्यात येत होतं. त्याचबरोबर कराटे शिबिरे आयोजित करून कट्टरता वाढवण्यात येत होती अशी माहिती PFIशी संबंधित असलेल्या आरोपीनी दिली आहे.












































