मुंबई, दि. २३ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्याला आता एक सुपर मुख्यमंत्री मिळाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर बसून राज्य चालवत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचने केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत गेले आहेत. गेले तीन दिवस ते दिल्लीत तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत त्यांची खुर्ची रिकामी नाही, तर ही जबाबदारी त्यांचे चिरंजीव सांभाळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने या परिस्थितीवर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्र्यांची जबाबदारी त्यांच्या चिरंजीव यांना दिली आहे काय असा रोकडा सवाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे.
आपल्या चिरंजीवाला सरकार चालवण्यासाठी पुढे केलं आहे का… खा. श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा…, असे शालजोडितले टोले राष्ट्रवादीने लगावले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय. हा कोणता राजधर्म आहे ?असा कसा हा धर्मवीर ? असं ट्विट राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष रविकांत वरपे यांनी केलं आहे.