दुर्गा देवी मंडळांना’ विनाअट परवानगी द्या – संतोष सौंदणकर

0
239

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – गणेशोत्सवाप्रमाणेच गरबा-दांडिया भरविण्यासाठी देखील दुर्गा देवी मंडळांना विनाअट परवानगी द्याव्यात. त्यासाठी एक खिडकी योजनेस मंजुरी द्यावी अशी मागणी, पिंपरी-चिंचवड शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविले आहे. त्यात सौंदणकर यांनी म्हटले आहे की, सध्या राज्यात नवरात्रौत्सवाचे वातावरण सुरू आहे. अशामध्ये आपल्या सरकारकडून नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी प्रतिबंध घातले आहेत. ही बाब हिंदुत्व जपण्यासाठी घातक आहे.

गणेश मंडळांना आवश्यक सर्व परवानग्या दिल्या. शुल्क देखील माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील गणेश भक्तांकडून आनंदात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दुर्गा देवी मंडळांना बिनशर्त परवानगी द्यावी. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये, अशी मागणी सौंदणकर यांनी निवेदनातून केली आहे.