गांजा बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

PCB Admin
1 Min Read

देहूरोड, दि. २१ (पीसीबी) – गांजा बाळगल्या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून 490 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 20) दुपारी पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथील उड्डाणपुलावर करण्यात आली.

विजयकुमार श्रीकृष्ण चौधरी (वय 30, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने बंटी साळुंके (रा. दांडेकर पूल, पुणे) यांच्याकडून गांजा आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गांजा बाळगल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी कारवाई करून विजयकुमार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 11 हजार 500 रुपये किमतीचा 490 ग्रॅम गांजा, दोन हजारांचा मोबाईल फोन, 600 रुपये रोख रक्कम असा एकूण 14 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article