पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयातील 334 विना परवाना गैरहजर राहणा-या सफाई कामगाराची वेतनवाढ रोखली आहे. याबाबतचा आदेश प्रशासनाने काढला आहे.
सुनिल रघुनाथ होळकर असे या सफाई कामगाराचे नाव आहे. होळकर हे ऑगस्ट 2019 ते डिसेंबर 2020 या कालावधीत तब्बल 334 दिवस विना परवाना गैरहजर राहिले. आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा असताना होळकर यांनी कामावर हजर राहिले नाहीत. याबाबत त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली.
या चौकशीत होळकर दोषी आढळल्याने त्यांची एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. तसेच यापुढे विना परवाना गैरहजर राहिल्यास, कार्यालयीन कामकाजात गैरवर्तन केल्यास शिस्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.