पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम, राज्यात भाजपाच पुढे…

0
295

पुणे, दि. १९ (पीसीबी) : राज्यातील विविध १६ जिल्ह्यांमधील ५४७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत सुमारे ७६ टक्के मतदान झाले.निवडणुकीचे निकाल येण्यास प्रारंभ झाला आहे. आत्तापर्यंतच्या निकालामध्ये शिंदे-भाजप गटाने ७६, काँग्रेसने २० तर राष्ट्रवादीने ३१, शिवसेना १० आघाडीने ६१ ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम असून आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली १८ पैकी १४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच विजयी झाले आहेत.

१६ जिल्ह्यांपैकी ६०८ ग्रामपंचायत आणि थेट सरपंच पद निवडीसाठीही रविवारी मतदान झाले. त्यापैकी ५४७ ग्रामपंचायतीचा आज निकाल आहे. त्यातही जवळपास 51 ग्रामपंचायती आगोदरच बिनविरोध झाल्या आहेत.

आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींचा आतापर्यंतचा निकाल, १८ पैकी १४ ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात, तीन ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचं वर्चस्व, जुन्नर तालुक्यातसुध्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांचेच वर्चस्व कायम असल्याचे निकालातून दिसले.