इंडियन स्वच्छता लीगसाठी पावणेपाच लाखांचे टी-शर्ट अन टोप्या

0
152

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभरात इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आले असून या लीगसाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेने पावणेपाच लाखांचे टी शर्ट आणि टोप्या खरेदी केल्या आहेत.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभरात इंडियन स्वच्छता लीगचे अंतर्गत कचरा मुक्त शहरासाठी पीसीएमसी पायोनिअर्सचे आज (शनिवार) रोजी आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये 9 ठिकाणी प्लॉगेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सिने अभिनेते सयाजी शिंदे यांची ब्रॅन्ड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे.

या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी टी शर्ट आणि टोप्यांची गरज होते. यासाठी महापालिकेच्या भांडार विभागातर्फे अल्प मुदतीत निविदा प्रसिध्द करून 1600 टी शर्ट, 1600 टोप्या उपलब्ध करून घेण्यात आल्या आहेत. टी शर्टसाठी 3 लाख 84 हजार तर टोप्यांसाठी 81 हजार 600 असे 4 लाख 65 हजार 600 रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. या टी-शर्ट आणि टोप्यांवर इंडियन स्वच्छता लीग आणि पीसीएमसी पायोनिअर्सची जनजागृती करण्यात आली आहे.