इस्लाम वाचविण्यासाठी भारतावर हल्ला करण्याचे इस्लामिक स्टेट संघटनेचे आदेश

0
341

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेनं भारताविरुध्द उघड भूमिका घेतलीय. आयएसनं सर्व मुस्लिमांना एकत्र येऊन भारतावर हल्ला करण्याचं आवाहन केलंय. भारतात इस्लामचं रक्षण करणं हा या मागचा उद्देश असल्याचं आयएसनं स्पष्ट केलं. भारत सरकार सतत इस्लामला लक्ष्य करत असल्याचंही आयएसनं म्हटलंय. या सर्व बाबी आयएसचा प्रवक्ता अबू उमर-उल-मुजाहिर यानं निवेदन जारी करताना सांगितल्या आहेत. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या प्रवक्त्यानं एक निवेदन जारी करून मुस्लिमांना भारतात दहशतवादी हल्ले करण्याचं उघडपणे आवाहन केलंय.

आयएसचा प्रवक्ता अबू ओमर-अल-मुजाहिर यानं भारताविरुद्ध संयुक्त हल्ला व्हायला हवा, असं म्हटलंय. दक्षिण आणि आग्नेय आशियातील मुस्लिमांना एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. इस्लामिक स्टेटचा उद्देश भारतात इस्लामचं संरक्षण करणं हा असल्याचं मुजाहिर यांनी म्हटलंय. ‘

मुजाहिर म्हणाले, भीतीमुळं मुस्लिमांमधील धर्म रक्षणाची भावना संपलीय. त्यांच्यात आता शत्रूशीही लढण्याची ताकद उरलेली नाही. मुजाहिर यांनी हे 32 मिनिटांचं भाषण अरबी भाषेत प्रसिद्ध केलंय. मुजाहिरच्या भाषणात भारतातील मुस्लिमांना देशावर आक्रमण करण्यासाठी भडकवलं जात आहे. व्हिडिओमध्ये मुजाहिरनं पाकिस्तान, बांगलादेश, फिलिपिन्स, मलेशिया, इंडोनेशिया आणि सिंगापूरमध्ये राहणाऱ्या मुस्लिमांव्यतिरिक्त भारतातील मुस्लिमांना एकत्र येऊन भारतावर हल्ला करण्याचं आवाहन केलंय.