चिंचवड परिसरात गणेशोत्सवानिमित्त ३ मंडळानी एकत्रित रित्या येऊन भव्य रक्तदान शिबिराचे केले आयोजन

0
482

चिंचवड,दि.१०(पीसीबी) – मातोश्री मित्र मंडळ, छत्रपती शासन युवा प्रतिष्ठान, श्रीराम प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले . चिंचवड येथील बळवंत नगर परिसरात रक्तदान शिबिर आयोजित केले होते. मंडळाचे अध्यक्ष शुभम जाधव बसवराज हेळवे, शुभम पवार, साहिल शेख, धनंजय अंबुसकर दिलीप सोनकांबळे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

“रक्तदान हेच जिवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” असे समजले जाते राज्यातील विविध रुग्णांलयामध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढीमधील साठा कमी पडू लागला आहे हीच गरज लक्षात घेऊन “मातोश्री मित्र मंडळ” छत्रपति शासन युवा प्रतिष्ठान , श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने काल दिनांक ८ सप्टेंबर , २०२२ गुरुवारी रक्तदानाचे आयोजन केले होते.

रक्तदानाच्या दिवशी अधिकाधिक रक्तदात्यांना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने गेले चार दिवस मंडळाचे कार्यकर्ते कार्यरत होते. रक्तदात्यांची पूर्वनोंदणी करून त्यांचे हिमोग्लोबिन, रक्तदाब आणि इतर तपासण्या करुण रक्तदान शिबिरास सुरुवात झाली.

रक्तदान शिबिरात ५० दात्यानी रक्तदान केले. सकाळी १० ते ५ या वेळेत रक्तदान शिबिर पार पडले पिंपरी चिंचवड येथील वाय. सी .एम हॉस्पिटल रक्त केंद्राचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. पुजा मून सुनित आवठे , गीता चव्हाण , रेणुका मल्लेपू ,अंकिता पंडित , सुमित्रा गोडसे, सचिन कुदळे यांनी रक्त पिशव्यांचे संकलन केले.

संकेत नलावडे , जुबेर शेख , आदित्य अंबुसकर , शिवा हेळवे , आकाश गंजाळकर , सैफ शेख , श्री मरगील ,ओमकार घाग , विजय जाधव , कौशल दिघे , दिपक गायकवाड , ज्ञानेश जाधव , शुभम जाधव , आकाश राठोड आदि कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडन्यासाठी अथक परिश्रम घेतले.