स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश…! पाच महिलांची सुटका

0
371

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने पर्दाफाश केला. या कारवाईमध्ये दोघांना अटक करत पाच महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (दि. 6) साई चौक, जगताप डेअरी, पिंपळे सौदागर येथे केली.

रमेश कुमार साहिराम (वय 24, रा. पिंपळे सौदागर. मूळ रा. राजस्थान) आणि एक महिला (वय 37) या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप डेअरी, पिंपळे सौदागर येथे साई सागर प्लाझात आरोपी महिला कॅसल स्पा नावाने स्पा सेंटर चालवत होती. तिने स्पा मॅनेजर आरोपी रमेश साहिराम याच्या सोबत मिळून पाच महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्राप्त केले. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी बनावट ग्राहकांना स्पा सेंटरमध्ये पाठवून पडताळणी केली आणि या प्रकरणाचा भांडाफोड केला. पाच महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. यात रोख रक्कम, मोबाईल आणि इतर साहित्य असा 13 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.