वातावरणात बदल..! उन्हाचा तडाखा वाढला; सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर ‘हिट’

0
618

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – सप्टेंबर महिन्यातच ऑक्‍टोबर हिट व अधून-मधून पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण अशा बदलत्या हवामानाचा फटका पिंपरी-चिंचवडकरांना बसला आहे. या बदलत्या वातावरणामुळे व्हायरल फिव्हरच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.  सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू हे आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे.

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असतानाच नागरिकांना ऑक्टोबर हिटची झलक पहायला मिळत आहे. गेल्या  चार ते पाच दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून, उन्हाचे चटके आणि उकाडाही अनुभवायाला मिळतो आहे. दिवसभर कडक ऊन पडत आहे. सायंकाळी
ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पावसाचा हलकासा सटकारा येतो. तर, रात्री उकाडा होतो.

पुण्याचे आजचे कमाल तापमान 31.06 तर पिंपरी- चिंचवडच्या कमाल तापमानाची 31 अंश सेल्सिअस नोंद झाली. किमान तापमानातही वाढ झाली आहे. आकाश सामान्यतः ढगाळ राहील आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.