कारमध्ये सुरु होता कपलचा रोमान्स, चोरांनी साधली संधी, गाडीसह कपडे पण पळवले…

0
384

विदेश,दि.०४(पीसीबी) – ब्राझील एक असा देश आहे जिथे सार्वजनिक ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित करणं गुन्हा आहे. असे असतानाही कारमध्ये एक जोडपे नग्न अवस्थेत शारीरिक संबंध प्रस्थापित करत होते. ही बाब चोरट्यांना समजताच त्यांनी या संधीचा फायदा घेतला. ब्राझीलमध्ये हे जोडपे रात्री त्यांच्याच कारमध्ये धुंदपणे रोमान्स करत होते. यादरम्यान चोरटे तेथे पोहोचले आणि चोरट्यांनी तरुणाकडील पर्स आणि मोबाईल हिसकावून गाडीसह पळ काढला. एवढंच नव्हे तर त्या दोघांनाही त्यांनी नग्नावस्थेत रस्त्याच्या कडेला सोडून पळ काढला.

ही घटना 17 ऑगस्टची आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये मुलगा आणि मुलगी रोमान्स करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सारे जग विसरून ते स्वतःमध्येच मग्न होत. यानंतर तीन चोरटे त्या गाडीजवळ आले. त्यांनी गाडीचा दरवाजा ठोठावला. यानंतर ते जबरदस्तीने कारमध्ये घुसले आणि जोडप्याला नग्न अवस्थेत रस्त्यावरच सोडून त्यांनी कारसह पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

हा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजचा आहे, जो लीक झाला आहे. कारमध्ये बसलेल्या जोडप्यावर हल्ला करून चोरट्यांनी त्यांच्याकडील पैसे आणि मोबाइल हिसकावून घेतल्याचं या व्हीडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

यादरम्यान त्यांना नग्न रस्त्यावर सोडून त्यांच्यावर कपडे फेकले. ही घटना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचं बोललं जात आहे. चोरट्यांनी यापूर्वी कारच्या खिडकीची काच फोडल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर, कपड्यांशिवाय रोमान्स करणाऱ्या जोडप्याला बाहेर काढण्यात आलं.