मोठ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने केला साठ वर्षीय जन्मदात्या आईचा खुन…

0
307

पुणे,दि.०२(पीसीबी) – एका मोठ्या राजकीय पक्षाच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्याने आपल्याच साठ वर्षीय जन्मदात्या आईचा खुन करुन तिच्या मृतदेहाचे तब्बल नऊ तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार मुंढवा परीसरात उघडकीस आला आहे. त्याहुनही संतापजणक बाब आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावता यावी. यासाठी, मृतदेहाचे तब्बल नऊ तुकडे वेगवेगळ्या नऊ पिशवीत भरुन, मृतदेहाच्या पिशव्या मुळा-मुठा नदीत नऊ वेगवेगळ्या ठिकाणी फेकुन दिल्याचेही पुढे आले आहे. विशेष बाब म्हणजे आईच्या हत्येत व हत्येनंतर मृतदेहाच्या नऊ तुकड्यांची विल्हेवाट लावण्यात, संबधित पदाधिकाऱ्यांचा वीस वर्षीय मुलगाही सामिल असल्याचे पोलिस तपासात निस्पन्न झाले आहे.

पोलिस सुत्रांच्याकडुन मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पिडीत मयत महिला ही देहुरोड येथील शासकीय कार्यालयात माळीकाम करत होत्या. तर त्यांचे पती म्हणजे या प्रकरणातील आरोपीचे वडीलही वानवडी परीसरातील शासकीय कार्यालयात माळीकाम करत होते. या कामातुन मिळणाऱ्या पैशातुन पिडीत महिलेने आपल्या मुळाबाळासाठी मुंढवा परीसरात दिड गुंठे जागा खऱेदी करुन, त्या जागेवर घऱ बांधले होते. पिडीत महिलेला तीन मुली व दोन मुले असा परीवार होता. तिनही मुलीची लग्न झालेली असुन, तिघींही आपआपल्या घरी राहतात.

दरम्यान ऑगष्ट महिण्याच्या पहिल्या आठड्यात घऱ खाली करावे यासाठी मुलगा व त्याचे कुटुंबिय मारहान करत असल्याची तक्रार पिडीत महिलेने आपल्या तीनपैकी मधल्या मुलीकडे केली होती. या तक्रारीची खातरजमा करण्याच्या उद्देशने पिडीत महिलेची मुलगी पाच ऑगष्ट रोजी घरी आली असता, घरात आई नसल्याचे मुलीला आढळुन आले. याबाबत पिडीत महिलेच्या मुलीने आईबाबत भावाकडे व त्याच्या वीस वर्षीय मुलाकडे चौकशी केली असता, दोघांनीही दमदाटी करुन मुलीला व तिच्या नवऱ्याला हाकलुन दिले. मात्र घरातुन बाहेर पडतांना घऱात मोठ्या प्रमानात रक्त सांडल्याचे दिसुन आल्याने मुलीला काही तरी काळेबेरे घडल्याची शंका मनात आली.

याबाबत मुढंवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईने घऱ खाली करावे या किरकोळ कारणासाठी आईचा खुन करणारा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी व त्याच्या वीस वर्षीय मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच आईच्या मृतदेहाच्या नऊ तुकड्यापैकी कांही तुकडे विविध ठिकाणाहुन पिशवीसह ताब्यात घेतले आहेत. तर उर्वरीत तुकडे शोधण्याचे काम युध्दपातळीवर चालु आहे. कांही नागरीकांना मदीपात्रात पिशवीत असलेले पिडीत महिलेच्या मृतदेहाचे तुकडे दिसुन आल्याची माहिती पोलिसांना दिल्यानेच, वरील तुकडे जमा करता आले आहेत. दोन्ही मांजरी गावांना जोडणाऱ्या नदी पात्रावरील पुलावरुन मृतदेहाच्या पिशव्या नदीत टाकल्याची कबुली या प्रकरणातील संशयित आरोपीं व त्याच्या मुलाने पोलिसांना दिली आहे.