भाजप- मनसे युती झाली तर भाजपाला फायद्यापेक्षा नुकसान जास्त – आठवले

0
199

मुंबई, दि. २ (पीसीबी) – भाजपाला खरं तर मनसेची गरज नाही. भाजप-मनसे युती झाली तर भाजपाला त्याचा फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्त सहन करावं लागेल. मुंबईतल्या मराठी माणसांसाठी राज ठाकरेंना भाजप जवळ करत असेल तर देशपातळीवर भाजपाला मोठा फटका बसू शकतो, असा इशारा रिपाइ अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलाय. टीव्ही 9 ऑफिसमध्ये रामदास आठवले यांनी आज पत्रकारांशी दिलखुलास संवाद केला. यावेळी त्यांनी राज्यातल्या सद्यस्थितीवर मोकळेपणाने मतं मांडली.

सभा चांगल्या, पण मतं मिळत नाहीत…
राज ठाकरेंचं व्यक्तीगत कौतुक करताना रामदास आठवले म्हणले, ‘राज ठाकरे चांगले नेते आहेत. सभा होतात. पण त्यांना मतं मिळत नाहीत. त्यामुळे राज ठाकरेंना भाजपने सोबत घ्यावं हे माझं मत नाही.

भाजपला तशी आवश्यकताच नाही…
राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतलं तर त्यांना उत्तर भारतीय, साउथ इंडियन मतं मिळणार नाहीत. मनसेला सोबत घेतलं तर देशपातळीवर नुकसान होऊ शकतं. राज ठाकरेंची भूमिका मराठी माणसांसाठी महत्त्वाची आहे. पण मुंबईतल्या इतर लोकांना विरोध करण्याच्या भूमिकेमुळे भाजपाला हे परवडणारं नाही.