पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – नदी प्रदुषण टाळण्यासाठी गणेश मूर्तींचे विसर्जनासाठी हौद करावेत अशी सुचना नागरिकांनी केली होती आणि कार्यक्षम नगरसेविका सिमासाई सावळे यांनी तात्काळ त्याची अंमलबजावणी केली. मोशी प्राधिकरणात सेक्टर ६ मधील जलवायू विहार शेजारील मैदानात ही सोय केली आणि नागरिकांनीही भरभरून प्रतिसाद दिला. गेली सहा वर्षे न चुकता विसर्जन हौदाची ही परंपरा अखंडपणे सुरू आहे.
एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व या तत्वाने सतत कार्य कऱणाऱ्या जेष्ठ नगरसेविका सिमाताई सावळे यांनी मुळात हा उपक्रम सुरू केला त्यामागचे कारणही तसेच आहे. सहा वर्षांपूर्वी गणेशोत्सव सुरू होण्याच्या अगोदर वार्डमध्ये सिमाताई सावळे या प्रचार करत होत्या. फिरत असताना स्पाईनरोडला नागरिकांनी गणपती विसर्जनाबाबत काही महत्वाच्या सुचना केल्या. त्यात सर्वात चांगली सुचना विसर्जन हौद करण्याची होती. सिमाताई सावळे यांनी ताबडतोब त्याची दखल घेतली आणि विसर्जन हौद बांधला. परिसरातील हजारो गणेश भक्तांची मोठी सोय झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. पुढे सलग सहा वर्षे हा उपक्रम स्वतःहून सिमाताईंनी सुरू ठेवला. यावेळीही असाच हौद तयार कऱण्यात आला असून गणेश भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिमाताई सावळे यांनी केले आहे.