51 कॉंग्रेस नेते आणि पदाधिकरी आपल्या पदांचे राजीनामे देणार

0
253

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – गुलाब नबी आझाद यांनी कॉंग्रेसला राम राम केल्या नंतर कॉंग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. माहिती मिळतेय की जम्मू कश्मिरमध्ये तब्बल 51 कॉंग्रेस नेते आणि पदाधिकरी आपल्या पदांचे राजीनामे देणार आहेत. ते सगळे नेते आझाद यांच्या सोबत जाणार असल्याचे समजते. याच्या आगोदर सुध्दा अनेक नेत्यानी आझाद यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. आझाद जम्मू कश्मिरमध्ये नवा पक्ष काढण्याची तयारी करत अल्याच्या अनेक बातम्या येत आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार मंगळवारी अनेक नेते कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देवू शकतात. सोमवारी राज्याच्या माजी विधानसभा उपअध्यक्षांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर आजी-माजी मंत्री आणि आमदारांसह पक्षाच्या जवळपास डझनभर ज्येष्ठ नेत्यांनी राजीनामे देऊन आझाद यांना पाठिंबा दिला आहे.

तसेच मोठ्या संख्येने पंचायत समिती सदस्यांनी आणि अनेक कार्यकर्त्यांनी आझाद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी दावा केला आहे की कश्मिर मधील 95% राजकीय संस्था, राजकीय नेत्यांनी आझाद यांना पाठिंबा दिला आहे. आझाद यांनी सोनिया गांधी यांना 5 पाणी पत्र लिहून राजीनाम्याची कारणे दिली होती, आणि यातच राहूल गांधी यांच्या वर टिका केली होती.