भांडण सोडविल्याच्या रागातून तिघांना मारहाण

0
318

वाकड, दि. ३० (पीसीबी) – भांडण सोडविल्याच्या रागातून चार जणांनी मिळून एका तरुणाला आणि त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 28) सायंकाळी तापकीरमळा चौक, काळेवाडी येथे घडली.

सलीम नजर मोहम्मद खान (वय 29, रा. तापकीरमळा चौक, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोंद्या पोतदार, सचिन सीताराम चौधरी (वय 20, रा. काळेवाडी), शुभम जाधव, नि-या (सर्व रा. काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या मित्रांशी झालेले भांडण सोडविले. याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ, दमदाटी करत फिर्यादी आणि त्यांच्या ओळखीचा मुलगा सोनू विनोद राम यांना लाथाबुक्क्यांनी व रॉडसारख्या हत्याराने मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांच्या पत्नी आल्या असता आरोपींनी त्यांना गट्टू फेकून मारत जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.