नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मी सत्तेची कोणतीही जबाबदारी घेणार नाही असे मोठं विधान केलं आहे. त्यामुळे शरद पवार पंतप्रधान होणार या चर्चेला पुर्णविराम लागला आहे.एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान पद आणि महाविकासआघाडी एकत्र निवडणुक लढण्यासंदर्भात भाष्य केलं आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यास शरद पवार यांचं मोठा वाटा होता. त्यामुळे आता शिवसेना फुटल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर तीन पक्षांच्या आघाडीचं काय होणार हा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होता आहे. दरम्यान, शरद पवारांनी मी सत्तेची कोणतीही जबाबदारी घेणार नाही असे म्हटले आहे.
मी कोणत्याही प्रकारे सत्तेत सहभागी होणार नाही, तसंच सत्तेची जबाबदारीही घेणार नाही. मोरारजी देसाईप्रमाणे मी ८२ व्या वर्षी पंतप्रधान होणार नाही. ८२ व्या वर्षी पंतप्रधान होण्याचा कित्ता मी गिरवणार नाही. असे स्पष्ट विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. तसेच, आगामी निवडणुका महाविकासआघाडी म्हणून एकत्र लढावी, असं आमचं मत आहे, पण त्यावर निर्णय झालेला नाही. आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरं जावं का याची चाचपणी करत आहोत, पण अजूनही निर्णय झालेला नाही. समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवं, असं माझं मत आहे, असंही पवार म्हणाले
सामन्यांची प्रश्न सोडवण्यासाठी विवध लोकांना एकत्र आणण्याचे सुख माझ्या वाटेला असाव अस विधानही त्यांनी यावेळी केलं.










































