महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षक पदी इंद्रजित कामतेकर यांची निवड

0
734

पुणे,दि.२८(पीसीबी) – महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशनच्या महिला क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षक पदी श्री. इंद्रजित कामतेकर यांची निवड करण्यात आली आहे. २०२२-२३ या वर्षांत होणाऱ्या महिला क्रिकेट संघाच्या सर्व सामन्यांसाठीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी श्री. इंद्रजित कामतेकर यांच्याकडे देण्यात आली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशनच्या सर्व पदाधिकारी तसेच सेक्रेटरी यांच्याकडून श्री. इंद्रजित कामतेकर यांची निवड करण्यात आली. या निवडीबाबतचे एक पत्रही कामतेकर यांना देण्यात आलं आहे.

या पत्रात महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशनचे सचिव रियाझ बागबान लिहतात, ” तुम्हाला कळवताना मला अतिशय आनंद होत आहे की तुमची २०२२-२३ या वर्षासाठी वरिष्ठ महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला तुमच्या योगदानाचा फायदा होईल. कृपया तुमची स्वीकृती कळवा.”

दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशनच्या अध्यक्षपदी विकास काकटकर, उपाध्यक्षपदी अजय गुप्ते, सचिव पदी रियाझ बागबान हे कार्यरत आहेत.