भरधाव कारची तरुणाला धडक

0
300

पिंपरी दि. २८ (पीसीबी) -रस्त्याच्या बाजूला मित्रांसोबत बोलत थांबलेल्या तरुणाला भरधाव वेगात आलेल्या एका कारने उडवले. त्यानंतर फिर्यादीस मदत न करता कारचालक पळून गेला. ही घटना शुक्रवारी (दि. 26) रात्री संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.

श्रीनिवास हनुमंता नायक (वय 32, रा. निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी किरण पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास त्यांच्या मित्रांसोबत संत तुकाराम नगर येथील एका हॉटेल समोर बोलत थांबले होते. त्यावेळी किरण पवार याने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगात चालवून श्रीनिवास यांना धडक दिली. श्रीनिवास कारच्या धडकेत गंभीर जखमी झाले. त्यांना मदत न करता आरोपी कार चालक पळून गेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.