पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – इंडो अथलेटिक्स सोसायटीतर्फे दरवर्षी पुणे ते शिवनेरी असे २०० किमी राईड चे आयोजन होते यावर्षी देखील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २७५ सायकल स्वरांनी यामध्ये सहभाग घेतला. सदर वर्ष पुणे ते शिवनेरी या राईडचे तिसरे वर्ष आहे आणि दरवर्षी यायला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरण आणि आरोग्य या दोन्हींचा संदेश समाजामध्ये देत सदर सायकल स्वारी मार्गक्रमन करते. एका दिवसामध्ये तब्बल 100 किलोमीटर अंतर पाच ते सहा तासांमध्ये पार केले.
27 ऑगस्ट रोजी नाशिक फाटा येथून सकाळी सहा वाजता उद्योजक अन्नारे बिरादार, एमआयडीसीचे अधिकारी प्रकाश शेडबाळे त्याचप्रमाणे आय ए एस चे गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ यांच्यातर्फे झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.
राजगुरुनगर येथे हुतात्मा राजगुरु सायकल क्लब, मंचर येथे साई प्रिंटर्स तर्फे अल्पोपहार आयोजन , नारायणगाव येथे साई संस्थान व शिवनेरी ॲथलेटिक असोसिएशन तर्फे स्वागत करण्यात आले. श्रीराज हॉटेल तर्फे सर्वांना मसाला दूध वाटप करण्यात आले.
पुणे ते शिवनेरी सायकल मार्ग – नाशिक फाटा – राजगुरुनगर – मंचर – नारायणगाव – शिवनेरी असा होता. अष्टविनायका मधील लेण्याद्री करून सर्व साईकलिस्ट ओझर येथे मुक्कामसाठी गेले आणि दुसऱ्या दिवशी याच मार्गावरून परतीचा प्रवास संपन्न झाला. असे आय ए एस शिवनेरी सायकल राईड चे प्रमुख श्रेयस पाटील आणि अजित गोरे यांच्या तर्फे सांगण्यात आले. नियोजनामध्ये कैलास शेट तापकीर , गिरीराज उमरीकर, कपिल पाटील, अमित पवार, रमेश माने, कॅड कॅफे कॉर्नरचे संचालक भावेश वाघ, सुशील मोरे , श्रीकांत चौधरी, प्रतीक पवार आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.









































