नवीन चित्रपट ‘उनाड’ थिएटरमध्ये रिलीजसाठी सज्ज

0
898

देश,दि.२७(पीसीबी) – चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध निर्माता, अजित अरोरा, जयना सुपरहिट चित्रपट ‘377 अब नॉर्मल’ साठी ओळखला जाते, ज्याने OTT प्लॅटफॉर्मवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे, त्यांचा नवीन चित्रपट ‘उनाड’ च्या थिएटरमध्ये रिलीजसाठी सज्ज आहे, ज्या मधे आशुतोष गायकवाड, हेमल इंगळे, अभिषेक भराटे, चिन्मय जाधव, संदेश जाधव आणि देविका दफ्तरदार यांच्या भूमिका आहेत.

हा चित्रपट एका छोट्या गावातील तीन तरुणांच्या जीवनावर आणि त्यांच्या जीवनातील संघर्षावर आधारित आहे. त्यांच्या आयुष्यातील एका टप्प्याची ही कथा आहे ज्याने त्यांना कायमचे बदलून टाकले.

चेक प्रजासत्ताक – युरोप येथे आयोजित “झ्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल” मध्ये युवा विभागातील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ‘उनाड’ची नुकतीच अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे.

भारतातील प्रतिष्ठित चित्रपट महोत्सव – MAMI (मुंबई अकादमी ऑफ द मूव्हिंग इमेज) मध्ये मेगा प्रीमियर (2022) साठी देखील त्याची निवड झाली.

त्याच्या आगामी ‘उनाड’ या चित्रपटाविषयी बोलताना अजित म्हणाला, “मला हे जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे की आमचा उनाड चित्रपट समर – २०२३ पर्यंत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आदित्य सरपोतदार यांनी अतिशय बारकाईने त्याचे दिग्दर्शन केले आहे. आमच्या संपूर्ण टीमने ह्या चित्रपटा साठी खुप खूप काम केल आहे. मला खात्री आहे की प्रेक्षकांना तो आवडेल.”