नदीवर बांधलेला १३ कोटींचा फुल दोन वर्षीच्या पावसातच धसला…

0
212

गुजरात,दि.२४(पीसीबी) – गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील कर्जन नदीवरील कोट्यवधी रुपयांच्या पुलाचा काही भाग पावसाच्या तुरळक अवधीनंतर कोसळला.

या पुलाच्या मधोमध ३० फूट खोल खड्डा तयार झाल्याने पुलाचे दोन भाग झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे चित्र समोर आल्यानंतर पुलाच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे.

या ठिकाणी लोक दोरी आणि शिडीच्या साहाय्याने पुलावर बनवलेला खड्डा पार करताना दिसत आहेत.