मुख्यमंत्र्यांच्या मुलीने डॉक्टरच्या तोंडात मारल्याचा व्हिडीओ व्हायरल

0
256

मिझोराम, दि. २२ (पीसीबी) – मिझोरमचे मुख्यमंत्री झोरमथंगा यांच्या मुलीने डॉक्टरला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री झोरमथांगा यांनी जाहीर माफी मागितली आहे. राजधानी आयझॉलमधील एका क्लिनिकच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांची मुलगी मिलारी छांगटे यांना आधी वेळ घेतल्याशिवाय भेटण्यास नकार दिला होता. डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांच्या मुलीला क्लिनिकमध्ये भेटायला येण्याआधी वेळ घेण्यास सांगितले. याच रागातून तिने डॉक्टरांना मारहाण केल्याचे समजते.

दरम्यान, या घटनेनंतर सुमारे 700 संतप्त डॉक्टरांनी आयझॉलमध्ये निदर्शने केली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) मिझोराम युनिटने या आंदोलनाचे नेतृत्व केले. डॉक्टरांनी आपापल्या रुग्णालयांमध्ये काळ्या फिती बांधून निषेध केला. आयएमएने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, अशा प्रकारचे उपचार पुन्हा होऊ नयेत, अशी त्यांची इच्छा आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) मिझोराम युनिटने या घटनेचा विरोध केला. त्याचवेळी डॉक्टरांनी काम करताना काळे बिल्ला लावले. यानंतर मुख्यमंत्री झोरमथांगा यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून जाहीर माफी मागितली.