गणेश मंडळांसाठी BMC ची नवी नियमावली

0
284

मुंबई दि. २१ (पीसीबी) – गेली दोन वर्ष राज्यासह देशावर करोनाचं संकट होतं. त्यामुळे सर्व सण-उत्सवांवर बंधनं होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार येताच सर्व सणांवरील बंदी उठवण्यात आली आहे. यंदा दोन वर्षांनंतर कुठल्याही निर्बंधांशिवाय गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये मोठं उत्साहाचं वातावारण पाहायला मिळत आहे. वाजत गाजत गणपतीचं स्वागत करण्यासाठी मुंबईतील गणेश मंडळ सज्ज झाले आहेत.

मात्र, कडक निर्बंध नसले तरी शिंदे सरकारने गणेश मंडळांसाठी काही नियम ठरवून दिले आहेत. गणेश मंडळांसाठी मुंबई महापालिकेने नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, गणेश मंडळांना या सर्व अटी पाळाव्या लागणार आहेत.

काय आहेत नव्या अटी?

मंडपाची उंची ३० फुटांपर्यंतच ठेवणं बंधनकारक असेल.

मंडप परिसरात खड्डे आढळल्यास २ हजार रुपयांचा दंड आकारला जाईल.

मंडपामध्ये कोणताही स्टॉल उभारता येणार नाही.

२५ फुटांवरील मंडपांचे बांधणी अहवाल सादर करणं बंधनकारक असेल.

पीओपीच्या गणेशमुर्तींवर उंचीच्या मर्यादेचं बंधन नसेल.

प्रतिबंधीत जाहिराती मंडपात लावल्यास कारवाई होईल.

साथीच्या रोगांचा धोका लक्षात घेता स्वच्छतेची जबाबदारी गणेश मंडळांची असेल.

स्पीकर, डीजेच्या आवाजाची डेसीबल मर्यादा पाळणं बंधनकारक असेल.