मुंबईला पुन्हा २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्याचा धोका

0
248

मुंबई, दि. २० (पीसीबी) : मुंबईला पुन्हा उडवून देण्याची धमकी आली आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. पोलीस कंट्रोल रुमला पाकिस्तानातून व्हॉट्सअप मेसेज आल्याची सूत्रांची माहिती आहे. हा मेसेज पाकिस्तानातून आल्याची माहिती आहे. गेल्या 3 दिवसांत दहशदवाद्यांशी संबंधित बातम्यांनी सुरक्षा यंत्रणांची झोप उडवली आहे.

दोनच दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात शस्त्रांनी भरलेली बोट सापडल्यानंतर आता मुंबईला दहशतवादी हल्ल्याची धमकी आल्याने काळजी वाढली आहे. धमकी देणाऱ्याने स्वतः तशी माहिती दिली आहे. या मेसेजविषयी अद्याप पोलिसांचे स्पष्टीकरण आले नाही. पण यामुळे मुंबईच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

‘आम्ही मुंबईला पुन्हा एकदा उडवण्याची तयारी केली आहे. यावेळीही 26/11 सारखा हल्ला केला जाईल. मी पाकिस्तानातून बोलत आहे. तुमचे काही भारतीयही आमच्यासोबत आहेत. त्यांचीही मुंबईला उडवण्याची इच्छा आहे. या हल्ल्यामुळे 26/11 हल्ल्याच्या स्मृती ताज्य होतील. ही धमकी नाही याची प्रचिती तुम्हाला लवकरच येईल.’ असा मेसेज आला आहे. मुंबई पोलीस कंट्रोल रुमला ही धमकी आली आहे.

‘माझे लोकेशन पाकमध्ये ट्रेस होईल. पण काम मुंबईत होईल. आमचा कोणताही ठिकाणा नसतो. त्यामुळे लोकेशन तुम्हाला आऊट ऑफ कंट्री ट्रेस होईल. उदयपूरसारखा शीर धडावेगळे करण्याचाही हल्ला होऊ शकतो,’ असे मेसेज करणाऱ्याने म्हटले आहे.