शहरातील 6 जणांनी मानाचा आयर्न मॅन किताब पटकाविला

0
452

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – कजाकिस्तान देशाची राजधानी शहर नूर सुलतान येथे 14 ऑगस्ट 2022 रोजी पार पडलेल्या आयर्न मॅन स्पर्धेमध्ये ट्राय फिट झोन पिंपरी-चिंचवड या ग्रुपमधील मधील 6 जणांनी मानाचा आयर्न मॅन किताब पटकाविला. त्यात राम गोमारे, वैभव ठोंबरे, सचिन वाकडकर, अमित लोंढे, रोहित क्षीरसागर, पांडुरंग बोडके यांचा समावेश आहे.

इशिम नदीच्या थंडगार पाण्यात 3.8 किमी पोहणे, हेड विंड क्रॉस विंड मध्ये 180किमी सायकल चालवणे आणि दिवसा गरम व रात्री थंड वातावरणात 42 किमी धावणे हा अतिशय खडतर प्रवास पूर्ण करणे जिकीरीचे काम होते, ते काम या तिघांनी अतिशय जिद्दीने पूर्ण केले आहे. या स्पर्धेसाठी हे 6 ट्रायथलित गेली 2 वर्षापासून अथक परिश्रम घेत आहेत. या ग्रुप मधील वैभव ठोंबरे हे उत्तम स्विमर असून त्यांनी बाकी 5 जणांना अतिशय उत्तमरीत्या पोहण्याचे धडे दिले, तसेच सायकलिंग व रूनिंग मधील बारकावे शोधून उत्तम असे मार्गदर्शन केले आहे.

या स्पर्धेच्या प्रवासात स्वतःची लढाई स्वताच्या संयमशी असते, सतत 16-17 तास न थांबता हा प्रवास करताना शरीर कोणत्या वेळी वेगळे वळण घेईल हे सांगता येत नाही, रेस दिवशी बॉडी थकली तरी चालेल पण मन थकले नाही नाही पाहिजे अशी भावना सर्व ट्रायथलिट यांनी व्यक्त केली, या ट्रायथलिटचे पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातून अभिनंदन होत आहे.

Ironman स्पर्धा म्हणजे नक्की काय असते ?
3.8 Km swimming (वेळ मर्यादा 2 तास 20 मिन ) नंतर 180 km cycling (वेळ मर्यादा 8 तास 10 मिन) आणि मग 42.2 km चे running ( 6 तास 30 मिन ) असे एका पाठोपाठ तीन प्रकार (Triathlon) एकूण 17 तासांच्या cut off time च्या आत पूर्ण करायचे असते.