काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद बंडाच्या पवित्र्यात

0
308

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाने जम्मू काश्मीरच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर काही तासातच राजीनामा दिला आहे. इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, प्रकृतीच्या कारणास्तव गुलाम नबी आझाद यांनी नवी जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. दरम्यान पक्षावर गेल्या काही काळापासून नाराज असलेले गुलाम नबी आझाद पक्षाविरोधात बंड पुकारण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

मंगळवारी काँग्रेस पक्षाने प्रचार समिती तयार केली होती. यामध्ये ११ नेत्यांचा समावेश करण्यात आला होता. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष या समितीचे स्थायी सदस्य होतेय. तारिक हमीद कारा यांची प्रचार समितीचे उपाध्यक्ष तर जीएम सरुरी यांची निमंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.