काही नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं – अजित पवार

0
323

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया दिली असून काही नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं असं एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. उशिरा का होईना महाराष्ट्राला नवं मंत्रिमंडळ मिळालं आहे. आता त्यांनी राज्याचे प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केली आहे. ज्यांना क्लीनचीट मिळालेली नाही त्यांची नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं असं ते म्हणाले.

टीईटी घोटाळ्यात स्वतःच्या तीन मुलिंना लाभ मिळाल्याचा आरोप नुकतेच शपथ घेतलेले मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आहे. तरुणीच्या आत्महत्ये प्रकऱणात संजय राठोड यांना महाआघाडी सरकारच्या काळात राजीनामा द्यायला लागला होता आता ते पुन्हा शिंदे- फडणवीस मंत्रीमंडळात मंत्री झाले. भाजपाच्या चित्रा वाघ यांनीही त्यांच्या मंत्रीमंडळ समावेशाला कडवा विरोध केलेला आहे. विजयकुमार गावित यांच्यावर मोठ्या घोटाळ्याचे आरोप आहेत.