हर हर महादेव…भीमाशंकर दर्शनाला तोबा गर्दी

0
309

पुणे, दि. ८ (पीसीबी) : आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकरला मुख्य शिवलिंगावर पहाटे महादुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर आरती झाल्यानंतर शिवलिंग विविध रंगाच्या फुलांनी सजविण्यात आले. दुस-या सोमवारी शिवलिंगावरील शंकर, पार्वतीचा हे रुप आगळंवेगळंच पहायला मिळाले आहे. सकाळपासूनच भिमाशंकर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केलीयं. यावेळी दर्शनासाठी मोठंमोठ्या रांगा बघायला मिळाल्या. श्रावणातील दुसरा सोमवार असल्याने दिवसभर भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता देखील आहे.

प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी
श्रावणातील दुसऱ्या सोमवारी असल्याचे परळीतील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलीय. यानिमित्त मंदिरात आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आली असून यात झेंडूसह गुलाब, मोगरा अशा विविध फुलांची सुंदर आरास करून परिसर भक्तिमय झालाय. ही आरास करण्यासाठी खास हैदराबादहून फुलं आणण्यात आली येत. तर ही सर्व आरास करण्यासाठी एक दिवसांचा कालावधी लागलाय. आकर्षक फुलांची सजावट पाहून भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहे.

भिमाशंकरच्या मुख्य शिवलिंगावर पहाटे महादुग्धाभिषेक
वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या आहेत. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथाच्या दर्शनासाठी राज्यच नाही तर देशातील विविध ठिकाणचे भाविक मंदिर परिसरात आले आहेत. त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने देखील व्यवस्था केलीये. तर सीसीटीव्हीद्वारे पोलिसांची करडी नजर इथे आहे. श्रावण महिन्यात दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी मंदिर परिसरात बघायला मिळते.