अश्लील हावभाव करत महिलेचा विनयभंग

0
344

चिखली, दि. ७ (पीसीबी) – घरासमोर काम करत असलेल्या महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहार. ही घटना शनिवारी (दि. 6) रात्री मोरेवस्ती, चिखली येथे घडली.

विश्वनाथ शंकर भोसले (वय 52, रा. चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या समोर राहतात. फिर्यादी त्यांच्या घरासमोर काम करत असताना आरोपी त्याच्या घराच्या दारात आला. त्याने फिर्यादीकडे पाहून अश्लील हावभाव करून त्यांचा विनयभंग केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.