शिंदे सरकारचे भवितव्य १२ ऑगस्टला ठरणार, सुप्रिम कोर्टाची सुनावणी पुढे ढकलली

0
461

मुंबई,दि. ६ (पीसीबी) : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सोमवारी (ता. ८) सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी आता शुक्रवारी (ता. १२) होणार असल्याची माहिती आहे. सुनावणीसाठी जे खंडपीठ बसणार होते, ते सोमवारी बसणार नसल्याची माहिती आहे. यामुळे राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची आणखी चार दिवस वाट पाहावी लागणार आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाकडे राजकारण्यांपासून सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. यामुळेच जवळपास दीड महिना होत असतानाही राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) करण्यात आलेला नाही. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयानंतरच विस्तार होईल, असे वृत्त असताना सुनावणी लांबल्याने आणखी वाट पाहावी लागणार आहे.