दापोडीत दोन चो-या ; 16 लाखांचा ऐवज लंपास..

0
421

दापोडी, दि. ६ (पीसीबी) – दापोडी परिसरात चोरीच्या दोन घटना घडल्या. यामध्ये चोरट्यांनी 16 लाख 19 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी शुक्रवारी (दि. 5) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिल्या गुन्ह्यात महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार 19 वर्षीय तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुलाबनगर, दापोडी येथे घडली. फिर्यादीशी असलेल्या नातेसंबंधाचा फायदा घेऊन आरोपी तरुणी फिर्यादीच्या घरात उघड्या दरवावाटे आली. तिने घरून एक लाख चार हजार 500 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

दुस-या घटनेत एका महिलेने अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. ही घटना सुंदरबाग दापोडी येथे घडली. फिर्यादी महिलेच्या घरातील बेडरूम मधील लाकडी कपाटातून अज्ञात चोरट्याने 15 लाख 15 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरून नेली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास भोसरी पोलीस करीत आहेत.