संजय राऊतांना आज कोर्टात हजर करणार ,कोठडी वाढणार की मिळणार जामीन

0
335

मुंबई दि. ४ (पीसीबी) – पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत हे सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. तीन दिवसांच्या इडी कोठडीनंतर आज त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. राऊतांच्या अटकेनंतर काही ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती तसेच एका सीएचा जबाब देखील नोंदविला होता.

यामध्ये काही महत्त्वाची माहिती मिळायचे सूत्रांचे म्हणणे आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी इडी पोलीस कोठडी वाढवून मागेल की संजय राऊत यांना जामीन मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अलिबाग येथील जमीन खरेदी करण्यासाठी संजय राऊत यांनी तीन कोटी रुपये रोख रकमेचा वापर केला होता अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात इडी कोठडी वाढवून मागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.