बंडखोरांच्या गाड्याच नाही तर तोंडही फोडू…

0
325

पुणे, दि. ३ (पीसीबी) – एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी (२ ऑगस्ट) पुण्यात हल्ला करण्यात आला. यावेळी सामंत यांच्या गाडीची काच फुटली. हल्ल्यानंतर सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधत हल्लेखोरांच्या हातात शस्त्रे कोठून आली, त्यांना माझ्या गाडीचा नंबर माहिती कसा झाला? असा सवाल करत हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. दरम्यान, सामंत यांच्या गाडीवर हल्ला होण्याआध शिवेसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. बंडखोरांच्या गाड्याच नव्हे तर तोंडही फोडू असे वक्तव्य कोकाटे पाटील यांनी केले होते. शिवसेनेतर्फे नांदेडमध्ये मंगळवारी सकाळी आंदोलन करण्यात आले होते. याच आंदोलनानंतर कोकाटे पाटील यांनी वरील वक्तव्य केले होते.

“वेळ आल्यावर गाड्याच नाही तर तोंडही फोडू. गाड्या फोडू, तोंडाला काळे फासू, त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू, त्याची काळजी करू नका. शिवसैनिक त्यासाठी समर्थ आहे,” असे दत्ता कोकाटे पाटील म्हणाले होते.