फ्लिपकार्ट कंपनीच्या डार्क स्टोअरमधून इलेक्ट्रीक वस्तू चोरणाऱ्या तिघांना अटक..

0
373

 भोसरी, दि. २ (पीसीबी) – मोशी येथील फ्लिपकार्ट कंपनीच्या डार्क स्टोअरमधून विविध इलेक्ट्रीक वस्तू चोरणाऱ्या तिघांना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार एप्रिल म्हणजे मागील चार महिन्यांपासून सुरु होता.जगदीश चन्नप्पा गौडशेट्टी (रा. भोसरी), सुरज राजू कांबळे (रा. मोशी), लक्षराज अरुण गुरव (रा. हिंदवी कॉलनी, देहू फाटा, पुणे) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी फ्लिपकार्ट कंपनीच्या मोशी डार्क स्टोअरचे व्यवस्थापक आनंद रामप्रसाद रतन (वय 26, रा. मोशी) यांनी सोमवारी (दि. 1) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फ्लिपकार्ट कंपनीच्या मोशी डार्क स्टोअर येथे कामगार आणि सुरक्षारक्षक आहेत. त्यांनी आपापसात संगनमत करून कंपनीतील एक लाख 27 हजार 715 रुपये किमतीच्या वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरी केल्या. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करत तीनही आरोपींना अटक केली असून एमआयडीसी भोसरी पोलीस पुढिल तपास करीत आहेत.