सीआयएच्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा दहशतवादी अल जवाहिरी ठार

0
334

वॉशिंग्टन,दि. २ (पीसीबी) : अमेरिकेने अफगाणिस्तानात घुसून सर्वात मोठी कारवाई केली आहे. सीआयएच्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा दहशतवादी अल जवाहिरीला ठार मारण्यात आलं आहे. अमेरिका मीडियाच्या आऊटलेट्सनेही माहिती दिली आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेने ड्रोन स्ट्राईक करून मोठी कारवाई केल्याची घोषणा व्हाईट्स हाऊसने केल्याचं अमेरिका मीडियाच्या आऊटलेट्सने म्हटलं आहे. आहे. ओसामा बिन लादेन याला मारल्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच या कारवाईमुळे दहशतवादी संघटनांना मोठा दणका देण्यात आला आहे. अल जवाहिरीवर अमेरिकेने 25 मिलियन डॉलरचं बक्षिस ठेवलं होतं. दरम्यान, व्हाईट हाऊसने अफगाणिस्तानात एक लक्ष्य पूर्ण करण्यात आल्याचा दावा केला असला तरी अमेरिकन सरकारने जवाहिरीला मारल्याचा कोणताही दावा केलेला नाही.

राष्ट्रपती जो बायडन हे अफगाणिस्तानात अल कायदाच्या विरोधातील दहशतवाद विरोधी अभियानाबाबत संध्याकाळी 7.30 वाजता माहिती देतील, असं व्हाइटस हाऊसने म्हटलं आहे. इजिप्तमधील डॉक्टर आणि सर्जन अयमान अल जवाहिरीने 11 सप्टेंबर 2001च्या हल्ल्यात समन्वय साधण्यासाठी मदत केली होती. त्यावेळी चार विमानांचं अपहरण करण्यात आलं होतं आणि न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवरवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात तीन हजार लोक मारले गेले होते. त्याचाच बदला घेण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये घुसून सीआयएद्वारे ड्रोन हल्ला केला आहे.

अमेरिकेचं अभियान यशस्वी
संयुक्त राज्य अफगाणिस्तानात अलकायदाने एक महत्त्वपूर्ण लक्ष्य म्हणून दहशतवाद विरोधी अभियान हाती घेतलं. ऑपरेशन यशस्वी ठरलं. या हल्ल्यात एकाही नागरिकाला काहीही झालं नाही. शेरपूरच्या एका घराला रॉकेटद्वारा लक्ष्य करण्यात आलं. हे घर रिकामे असल्याने कोणतंही मोठं नुकसान झालं नाही, असं अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल नफी ताकोर यांनी सांगितलं. तर, तालिबानच्याच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी काबुलवरून कमीत कमी एक ड्रोन उडाल्याची माहिती मिळाली होती.