घरफोडी करून दीड लाखाचा ऐवज लंपास

0
202

तळेगाव दाभाडे, दि. १ (पीसीबी) -तळेगाव दाभाडे मधील म्हस्करनेस कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून एक लाख 57 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 30) रात्री आठ ते रविवारी (दि. 31) सकाळी सात या कालावधीत घडली.

सोमनाथ दत्तात्रय शेडगे (वय 30, रा. तळेगाव दाभाडे) यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या राहत्या घराच्या दरवाजाला लॅच लॉक लावले होते. चोरट्यांनी लॅच तोडून घरात प्रवेश केला. घरातून चार तोळे व सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख 57 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.