सोमाटणे फाट्यावर महिलेचे गंठण हिसकावले

0
324

तळेगाव दाभाडे, दि. १(पीसीबी) -रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेचे सव्वा लाखाचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना रविवारी (दि. 10) दुपारी सोमाटणे फाटा येथे घडली.

याप्रकरणी एका महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पादचारी महिला रविवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास सोमाटणे फाटा येथून पायी चालत घरी जात होत्या. त्यावेळी समोरून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील एक लाख 25 हजार रुपये किमतीचे 2.5 तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसका मारून जबरदस्तीने ओढून नेले. त्यानंतर चोरटे दुचाकी वरून मुंबई- पुणे जुन्या महामार्गाने पुण्याकडे पळून गेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.