मोकळ्या जागेत गांजा सेवन करणा-या तरुणाला अटक

0
263

पिंपरी दि. १ (पीसीबी) -मोकळ्या जागेत गांजा सेवन करत असलेल्या तरुणाला पोलिसांवनी अटक केली. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी (दि. 31) दुपारी दोनच्या सुमारास सांगवी येथे केली.

संतोष सुनील जावळे (वय 24, रा. चंद्रमणी नगर, सांगवी गावठाण) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस कर्मचारी प्रसाद जंगिलवाड यांनी या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या कडेला मोकळ्या जागेत गांजा ओढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून संतोष याला ताब्यात घेतले. आरोपीकडे 50 रुपये किमतीचा पाच ग्रॅम गांजा व गांजा ओढण्याचे साहित्य मिळून आले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.