मालकिणीच्या विनयभंग प्रकरणी कामगाराला अटक

0
287

पिंपरी दि. १ (पीसीबी) -कामावर घेण्यास नकार दिल्याने दुकानदार महिलेच्या घरी जाऊन तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 31) सकाळी पिंपळे निलख येथे घडली. पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

रितेश रोहिदास सातसमुद्रे (वय 20, रा. बालेवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेच्या शाॅपवर जानेवारी 2022 पासून कामास होता. त्याला 14 जुलैपासून फिर्यदिने कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर तो पुन्हा रविवारी (दि. 31) फिर्यादी महिलेच्या शॉपवर आला. त्याने त्याला पुन्हा कामावर घेण्याची विनंती केली. मात्र फिर्यादीने त्यास नकार दिला. त्यानंतर फिर्यादी फ्लॅटवर गेल्या असता आरोपी फिर्यादीच्या पाठीमागून फ्लॅटवर गेला. तेथे फिर्यादी सोबत गैरवर्तन करत विनयभंग केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.